×
Loading...

श्रीभागवतपुराण गद्य स्कंध ०४ by श्री दिलिप वासुदेव आपटे

Book Information

Titleश्रीभागवतपुराण गद्य स्कंध ०४
Creatorश्री दिलिप वासुदेव आपटे
Mediatypeaudio
SubjectBhagawat; purana; mahapurana; Audio-book
Collectioncratediggers, folksoundomy
Uploadersatsangdhara
IdentifierBhagawat-Gadya-in-Marathi--Skandha--04
Telegram icon Share on Telegram
Download Now

Description

n case the text appears garbled - set you brower's Character Encoding to "Unicode (UTF-8)" भक्तिसाहित्यात श्रीमद् भागवत सर्वात् उच्च श्रेणीचा ग्रंथ आहे. तसेच सर्व पुराणामध्ये सर्वात जास्त अध्ययन होत असेल तर श्रीमद् भागवताचेच. याचे कारण काय असावे ? महाभारतात, विशेषतः महाभारताचा खिलभाग असलेल्या हरिवंशपुराणात आलेले कृष्ण चरित्र पाहता भागवतात कृष्णच्रित्राबद्दल अधिक माहिती आहे असे नव्हे. पण दोन ग्रंथातील चरित्र शैलीत महद् अंतर आहे.. महाभारतात ऐतिहासिक वर्णन आहे तर भागवतात जगन्नियंत्या परमेश्वराच्या लीलांचे भावमय, रसाळ दर्शन आहे. श्रीमद् भागवत ग्रंथ तसा आकार-विस्ताराने लहान नाही. कथा सप्ताहात सहसा सर्व भागवत कथन होत नाही. यात ३३५ अध्याय असून ते १२ स्कंधात विभागलेले आहेत. स्कंध १ ते ९ यांना कृष्णकथेची प्रस्तावना मानली लाते. कृष्णकथा मुख्यतः १० व्या स्कंधात असून त्यात ९० अध्याय आहेत. ११ व्या स्कंधात कृष्णाचे परलोक गमनापूर्वी त्याने उद्धवास सांगितलेली उद्धव गीता आली आणि १२ वा स्कंध उपसंहाराचा. संपूर्ण भागवताचे दर्शन व्हावे या हेतूने गीताप्रेसच्या ’श्रीमद्‌भागवतमहापुराणम् - केवळ मराठी अनुवाद’ याचे श्राव्य संस्करण प्रस्तुत. For other Audio-books, pravachan in Marathi, visit - satsangdhara.net